Tiger Attack : भादूर्णीत वाघाच्या हल्ल्यात महिला ठार
Chandrapur News : मूल तालुक्यातील भादुर्णी बिट परिसरात तेंदूपत्ता गोळा करताना वाघाच्या हल्ल्यात ३० वर्षीय महिला ठार. सलग दुसऱ्या दिवशी वाघाच्या हल्ल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मूल : तेंदूपाने गोळा करण्यासाठी आपल्या कुटुंबीयांसमवेत जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना सोमवारी (ता. १२) सकाळी आठ वाजताच्या दरम्यान भादुर्णी बिटाच्या कम्पार्टमेंट नंबर ७९३ मध्ये घडली.