
व्याहाड खुर्द : वैनगंगा नदीत अंघोळीसाठी गेलेले एमबीबीएसचे तीन विद्यार्थी बुडाले. ही घटना शनिवारी (ता. १० मे) दुपारच्या सुमारास घडली. गोपाळ गणेश साखरे, पार्थ बाळासाहेब जाधव आणि स्वप्नील उद्धवसिंग शिरे अशी नदीत बुडालेल्यांची नावे आहेत. सध्या शोधमोहीम सुरू आहे. मात्र, अंधार पडल्याने रविवारी ही शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.