Bike Accident : तिवसा येथे दुचाकी अपघातात गर्भवती महिलेचा मृत्यू; पती व मुलास दुखापत
Accident News : तिवसाच्या डवरगाव-मोझरी मार्गावर आज (ता. २१) एका दुचाकीवरून पडून २३ वर्षीय विवाहित महिलेचा मृत्यू झाला. आरती पंकज गवई असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेत तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
तिवसा : डवरगाव ते मोझरी मार्गावर आज (ता. २१) दुपारी दोन वाजेदरम्यान दुचाकीवरून पडून एका २३ वर्षीय विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आरती पंकज गवई (रा. आर्वी, जि. वर्धा), असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.