Amravati Accident : भीषण अपघातात दाम्पत्य ठार; चार चिमुकले जखमी, अकोला मार्गावरील घटना
Accident News : अकोला ते नागपूर महामार्गावर कार ट्रकला धडकून पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. अपघातात कारमधील चार चिमुकले जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अमरावती : अकोला ते नागपूर महामार्गावर कार उभ्या ट्रकवर जाऊन धडकल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील चार चिमुकले जखमी झालेत. शनिवारी (ता. सात) पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली.