

अमरावती (चिखलदरा / जामली) : चिखलदरा तालुक्यातील खोंगडा गावापासून सुमारे एक किलोमीटरवर असलेल्या जंगलातील जामुनाला जवळ वाघाने विनोद छोटेलाल चिमोटे (वय ३१, रा. केली, हरिसाल) यांच्यावर रविवारी रात्री आठ वाजेदरम्यान मुख्य मार्गावर हल्ला चढवित त्यांना ठार केले. वाघाने विनोद चिमोटे यांना घटनास्थळावरून सुमारे ४०० मीटरवर असलेल्या जामुनाल्यात ओढत नेले.