Chandrapur Accident: दुचाकींच्या धडकेत तीन ठार; मृतांत बापलेकाचा समावेश, सोमनाथ मार्गावर अपघात
Bike Accident: मूलजवळ भरधाव दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांत बापलेकासह आणखी एका तरुणाचा समावेश असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मूल : भरधाव वेगात असलेल्या दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. त्यात तीन ठार झाले. ही घटना बुधवार (ता. ८) दुपारी दीड वाजताच्या सुमारास मूलपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सोमनाथ मार्गावरील बलकी देव मंदिराजवळ घडली.