
मंगरूळपीर : छत्रपती संभाजीनगर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पेडगाव गावाजवळ आज (२३ जुलै) सकाळी साडेसहाच्या दरम्यान ट्रक आणि ट्रॅव्हल्स बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून, २० जण जखमी झाले आहेत. यातील सहा प्रवासी गंभीर जखमी असून, त्यांच्यावर वाशीम, शेलुबाजार आणि कारंजा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.