
संग्रामपूर : तालुक्यातील वरवट बकाल - संग्रामपूर रोडवर ट्रॅक्टर व आयशरमध्ये समोरा समोर धडक होऊन एक जण ठार झाल्याची घटना ता.२३ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. हा बळी अवैध रेती तस्करीमुळे गेल्याची चर्चा असून महसूल व पोलिस प्रशासन यांच्यावर प्रश्न उपस्थित होत आहे.