Electric Shock : कुलरचा शॉक लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू
Child Accident : नांदुरा तालुक्यातील वडाळी येथे ४ वर्षीय गौरव वक्टे याचा घरातील कुलरचा करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
नांदुरा : येथून जवळच असलेल्या वडाळी येथील गौरव चेतन वक्टे या चार वर्षाच्या चिमुकल्यास घरामध्ये खेळत असताना कुलरचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ता.१८ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता घडली.