
धामणा (लिंगा) : नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बाजारगांव येथून किमान पंधरा कि.मी. अंतरावर असलेल्या डिगडोह (पांडे) परिसरात रस्त्याचे काम सुरू असताना तरुणाचा टिप्परच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. स्थानिक नागरिकांकडून पीडित कुटुंबाला योग्य न्याय, भरपाई व कंत्राटदारावर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.