Gondia News : पिंडदान सोहळ्यात काळाचा घाला; नदीत बुडून तीन महिलांचा मृत्यू; गोंदिया येथील घटना
Water Accident : गोंदिया जिल्ह्यातील कोरणी येथील बाघ नदीत पाय घसरून महिला पडली आणि तिला वाचवताना आणखी दोन महिलाही बुडाल्या. तिघींचे मृतदेह दुपारी तीनच्या सुमारास बाहेर काढण्यात आले.
रावणवाडी (जि. गोंदिया) : महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेलगतच्या कोरणी येथील बाघनदीत बुडून तीन महिलांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. ८) दुपारी एकच्या सुमारास घडली. तिन्ही महिलांचे मृतदेह दुपारी तीनच्या सुमारास बाहेर काढण्यात आले.