
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील चमक बु. येथे कूलरचा जोरदार धक्का लागून आईसह तिच्या दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी (ता. १४) ही घटना घडली. सुमती लक्ष्मण कासदेकर (वय ३३), श्वेता लक्ष्मण कासदेकर (वय चार) व मुलगा विकी लक्ष्मण कासदेकर (वय दोन), असे मृत्यू झालेल्या मायलेकांची नावे असल्याची माहिती सरमसपुराचे ठाणेदार नीलेश गोपाळचावडीकर यांनी दिली.