Buldhana Newssakal
विदर्भ
Buldhana News: मोताळ्यातील युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू; दोन दिवसांपासून होता बेपत्ता, आकस्मिक मृत्यूची नोंद
Water Accident: मोताळा येथील ३१ वर्षीय स्वप्नील भारंबे यांचा मृतदेह दोन दिवसांनंतर विहिरीत आढळून आला. त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मोताळा : मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ३१ वर्षीय युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. २९) सकाळी मोताळा शिवारात उघडकीस आली. स्वप्नील मुकुंदा भारंबे (रा. मोताळा) असे मृतकाचे नाव आहे.