
माहूर : उज्जैन येथून दर्शन घेऊन परतताना मोटार आणि ट्रक अपघातात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील (इस्रो) वैज्ञानिक निकेतन पवार (वय २६) व त्याचे आई-वडील ठार झाले. हा अपघात बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव (नांदुरा) गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (ता.१२) मध्यरात्रीच्या सुमारास घडला.