Road Accident in Amravati : अपघातात पत्नी ठार, पतीसह दोघे जखमी; लिफ्ट मागणे जीवावर बेतले
Woman Dies in Amravati Road Accident : अमरावती-नागपूर महामार्गावर पिंपळविहीरजवळ दुचाकी व एसटी बसच्या अपघातात महिलेला जीव गमवावा लागला. तिचा पती व आणखी एक जण गंभीर जखमी झाले आहेत.
अमरावती : एसटी बस-दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात पत्नीचा मृत्यू झाला, तर पतीसह दोघे जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता.७) अमरावती ते नागपूर महामार्गावर नांदगावपेठ हद्दीतील पिंपळविहीर येथे घडली.