Tiger Attack : पतीसमोरच वाघाचा पत्नीवर हल्ला; पत्नी ठार, महादवाडी येथील घटना
Chandrapur News : मूल तालुक्यातील महादवाडी येथील जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात विमलबाई शेंडे या ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून हल्ल्यावेळी तिचे पती उपस्थित होते.
मूल : तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी जंगलात गेलेल्या तीन महिलांवर वाघिणीने हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतानाच रविवार (ता. ११) मूल तालुक्यातील महादवाडी येथे वाघाने पतीसमोर पत्नीवर हल्ला करून ठार केले.