पोलिस मुख्यालयात अदलाबदलीचे वारे!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 November 2019

नागपूर : पोलिस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांकडून ड्यूटी लावण्याचे पैसे घेतले जात असल्याचे "सकाळ'ने प्रकाशित करताच पोलिस आयुक्‍तांनी गांभीर्याने दखल घेतली. पोलिस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे समाधान व्हावे, यासाठी दरबार घेण्यात आला. या उपक्रमांर्तगत मुख्यालयात अदलाबदलीचे वारे वाहत असून पोलिस कर्मचाऱ्यांची खदखद काही प्रमाणात कमी झाली आहे. 

गेल्या 31 ऑक्‍टोबरला "सकाळ'ने "पोलिस मुख्यालयात ड्यूटी लावण्याचे ठरतात दर?' अशा मथळ्याने वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. वृत्त प्रकाशित झाल्यामुळे मुख्यालयातील सावळागोंधळ चव्हाट्यावर आला होता. पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी वृत्ताची दखल घेतली. स्वतः पोलिस आयुक्‍त आणि पोलिस सहआयुक्‍त रवींद्र कदम आणि पोलिस उपायुक्‍त विक्रम साळी यांनी मुख्यालयात कर्मचाऱ्यांच्या समस्यांच्या समाधानासाठी दरबार घेतला. यामध्ये मुख्यालयासह अन्य कर्मचाऱ्यांनी आपापल्या समस्या मांडल्या. डीसीपी साळी यांनी लगेच काही ड्यूटी रायटरची तडकाफडकी बदली तसेच नव्या दमाच्या कर्मचाऱ्यांना त्या जागांवर काम करण्याची संधी दिली. "थ्री स्टार'ने आगपाखड करीत माध्यमांना माहिती देण्याच्या संशयावरून काही कर्मचाऱ्यांना नाहक त्रस्त करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
लाभाच्या पदाला चिटकून? 
गेल्या अनेक वर्षांपासून काही कर्मचारी लाभाच्या पदावर चिटकून आहेत. "थ्री स्टार'च्या मर्जीतील असल्यामुळे "प्रेम' आणि "मुरत' हे दोघेही अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी आहेत. तसेच हे दोघे अन्य पोलिस कर्मचाऱ्यांना त्रस्त करीत असल्याची मुख्यालयात चर्चा आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: transfer in police headquarter