सुखद, अवयवदानातून पाच जणांत प्रत्यारोपण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

नागपूर : मेंदूमृत रुग्णाच्या अवयवाचे पाच गरजवंत रुग्णात आज येथील न्यू ईरा रुग्णालयात प्रत्यारोपण करण्यात आले. न्यू ईरा रुग्णालयातील दोन आणि दुसऱ्या मूत्रपिंडाचे सुपर स्पेशालिटीतील एका रुग्णात प्रत्यारोपण करण्यात आले. अवयवदानासाठी रुग्णाच्या चार मुलींनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हे यशस्वी प्रत्यारोपण झाले.

भंडारा येथील किसन पांडुरंग बनवडे (69) यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांना प्रथम भंडारा व त्यानंतर नागपूरच्या न्यू ईरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली. त्यावेळी त्यांचा मेंदू मृत झाल्याचे लक्षात आले. मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. नीलेश अग्रवाल, हृदय प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. आनंद संचेती, डॉ. निधीश मिश्रा यांनी कुटुंबाला अवयवदानाबाबत माहिती दिली. तिघांना जीवदान व दोन रुग्णांना नवीन दृष्टी मिळणे शक्‍य असल्याने किसन यांच्या चार मुलींनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. अवयवदानाचा निर्णय घेतला. विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या डॉ. विभावरी दाणी आणि डॉ. रवी वानखेडे यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर यकृत न्यू ईरातील 40 वर्षीय रुग्णात तर मूत्रपिंड 58 वर्षीय रुग्णात आणि दुसरे मूत्रपिंड सुपर स्पेशालिटीतील 38 वर्षीय रुग्णात प्रत्यारोपित केले. दोन बुब्बुळ माधव नेत्रपेढीला देण्यात आले आहे. ते प्रत्यारोपित झाल्यानंतर दोघांना दृष्टी मिळेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transplant five or more from the body