esakal | त्याने शक्कल लढवून ट्रॅक्‍टर ट्रॉलीतून केली याची वाहतूक...पण

बोलून बातमी शोधा

गोंदिया : पोलिसांनी जप्त केलेला दारूसाठा.

ट्रॅक्‍टर ट्रॉलीतून देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून 1 लाख 82 हजार रुपयांच्या दारूच्या बॉक्‍ससह ट्रॅक्‍टर व ट्रॉली असा एकूण 8 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई धाबेटेकडीजवळ रविवारी (ता. 22) दुपारी पावणेचारच्या सुमारास करण्यात आली.

त्याने शक्कल लढवून ट्रॅक्‍टर ट्रॉलीतून केली याची वाहतूक...पण
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गोंदिया : अर्जुनी मोरगाव येथून लाखांदूरकडे एक ट्रॅक्‍टर ट्रॉलीत देशी दारूच्या पेट्या भरून नेत असल्याची गुप्त माहिती अपर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार धुमाळ, पोलिस हवालदार कंगाली, पोलिस नायक राऊत यांना लाखांदूर मार्गावर सापळा रचण्यास सांगितले. पथकाने धाबेटेकडीजवळ रस्त्यावर थांबून वाहनांची तपासणी केली.

कोरोना व्हायरसच्या दहशतीत सारा जग असताना गोंदिया जिल्ह्यात एका आरोपीने देशी दारूची ट्रॅक्‍टरने वाहतूक केली. तपासणीत ही शक्कल कामी येणार, असे त्याला वाटले होते. मात्र पोलिसांनी तपासणी करून ट्रॅक्‍टर पकडले. पोलिसांनी या ट्रॅक्‍टरमधून 1 लाख 82 हजारांची दारू पकडली.

हेही वाचा : बंदोबस्तातील खाकी वर्दीसाठी ते आले घराबाहेर, माणुसकीचा धर्म जिवंत

एक लाखाची देशी दारू जप्त

दुपारी पावणेचारच्या सुमारास अर्जुनी मोरगावकडून येणाऱ्या एका ट्रॅक्‍टरला अडविले. ट्रॉलीची तपासणी केली असता, त्यात देशी दारूचे 70 बॉक्‍स आढळले. 90 मि.ली. ने भरलेल्या प्रत्येकी 100 बाटल्स देशी दारू सुप्रीम नंबर 1 असे लिहिलेले देशी दारूच्या एकूण सात हजार बॉटल्स आढळून आल्या. या दारूची किंमत 1 लाख 82 हजार रुपये इतकी आहे.

आरोपीला केली अटक

ट्रॅक्‍टर व ट्रॉलीसह दारू असा एकूण 8 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी पांडुरंग श्रीराम परशुरामकर (रा. पिंपळगाव, लाखांदूर) याला अटक केली आहे. पुढील तपास अर्जुनी मोरगाव पोलिस करीत आहेत.