नागपूर : प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना धमकावल्या प्रकरणी रामटेक पोलिसांनी प्रशांत ट्रेलर सर्व्हिस, काळंबोली (नवी मुंबई) या ट्रान्स्पोर्टचा मालक प्रशांत जाधव याच्यावर गुन्हा दाखल केला. .परिवहन आयुक्त कार्यालयातील काही अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून जाधव चेक पोस्टवरील आरटीओ कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर वसुली करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप जाधव याच्यावर आहे..तक्रारदार मंगेश रमेशराव राठोड (४५) रा. नवीन सुभेदार लेआउट, हे शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयात मोटार वाहन निरीक्षक आहेत. ३१ जुलै रोजी सकाळी ८:२१ वाजता ते कांद्री बॉर्डर चेक पोस्टवर कर्तव्यावर असताना ही घटना घडली..पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, प्रशांत जाधव सहकाऱ्यासह पांढऱ्या गाडीतून चेक पोस्टवर आला. तो विना परवानगी मोबाईलवर व्हिडीओ बनवित होता. त्याने राठोड यांना धमकी दिली की, त्याचे ट्रक तपासणीशिवाय पुढे जाऊ द्या, अन्यथा परिणाम भोगावे लागतील. राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जाधवने जातीवाचक अपशब्दांचा वापर केला. राठोड यांनी त्याच्या मागण्या मान्य करण्यास नकार दिला, तेव्हा जाधव आक्रमक होऊन चेक पोस्टवर गोंधळ घातला. त्यामुळे सुमारे अर्ध्या तासापर्यंत शासकीय वाहनांची तपासणी थांबवावी लागली..या प्रकाराचे साक्षीदार वाहनचालक विजय सोनटक्के व अदानी कंपनीचा एक कर्मचारी होते.राठोड यांच्या तक्रारीवरून रामटेक पोलिसांनी प्रशांत जाधवविरुद्ध कलम १३२, २२१, ३५२, ३५१(२) तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत कलम ३(१) (र), ३ (१)(स) आणि ३(२) (व्हीए) नुसार गुन्हा दाखल केला आहे..विशिष्ट अधिकाऱ्यांसाठी करतो काम!सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव यापूर्वीही मालवाहतूक ट्रकच्या बेकायदेशीर हालचालींमध्ये सहभागी राहिला आहे. तसेच आरटीओ कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्याची धमकी देत आला आहे. गोंदिया व औरंगाबाद आरटीओ कार्यालयातही त्याने अशाच प्रकारे दबाव टाकला होता. तो परिवहन आयुक्त कार्यालयाच्या १९९९ बॅचमधील काही अधिकाऱ्यांसाठी कार्य करीत असल्याचा संशय आहे..Yavatmal News: यवतमाळच्या दत्त चौकात भाजी खरेदीदरम्यान मोबाईल चोरी; यूपीआय फसवणुकीत २.४७ लाखांची लूट.नागपूर व छत्रपती संभाजीनगर आरटीओ कार्यालयातील अधिकारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दरमहा रसद देण्यास नकार दिला. म्हणून ठराविक कार्यालयात जाऊन प्रशांत जाधवला काही अधिकाऱ्यांना त्रास देण्यासाठी सांगण्यात आले होते. या टीमचा म्होरक्या दीपक पाटील या अधिकाऱ्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई करून गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे सूडभावनेतून दीपक व त्यांच्यासह अन्य टीमकडून हे दबावाचे षडयंत्र रचण्यात येत असल्याचे समोर आले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.