गुन्हेगारी वर्चस्वासाठी शस्त्र बाळगण्याचा ट्रेंड

gun
gun

अकोला : संवेदनशीलता कमी होऊन गुन्हेगारीकडे वळणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यासोबतच गुन्हेगारीमध्ये वर्चस्व राहले पाहिजे, लोकांनी मला भीले पाहीजे या आणि अशा अनेक कारणांनी शहरात देशी कट्ट्यासह धारदार शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तर अकोल्यात बुलडाणा जिल्ह्यासह मध्यप्रदेशातून शस्त्र आणली जात आहेत. स्थानिक गुन्हे शाखेसह विशेष पथकानी कारवाया करून ही शस्त्र जप्त केले आहेत. मात्र, या कारवायावरून शहरात गुन्हेगारीची मानसिकता बळावून शस्त्र बाळगण्याचा ट्रेंड तर तयार होत नाही ना? असा प्रश्न या निमीत्ताने समोर येत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरून स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाया करीत पिस्टल आणि धारदार शस्त्रे जप्त केले होते. या कारवायामुळे शस्त्र बाळगणाऱ्यांंमध्ये धडकी जरी भरली असली तरी ही शस्त्रे येतात तरी कोठून, हा प्रश्न या निमित्ताने अकोलेकरांना पडला आहे. विशेष म्हणजे, शहरातील अशिक्षीत आणि झोपडपट्टी परिसरातील युवकांकडेच ही शस्त्रे आढळत आहेत. धक्क्याला बुक्की लागल्यानंतर तत्काळ पिस्टल काढून धमकी देणारे युवक गुन्हेगारीत दबदबा कायम रहावा म्हणून शस्त्र बाळगत असल्याची माहिती विश्वसनिय सुत्रांनी दिली.

येथून येतात शहरात शस्त्र

विश्वसनिय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात पिस्टल आणि धारदार शस्त्रे ही मध्यप्रदेश, अजमेर, इंदूर, येथून तर बुलडाणा जिल्ह्यातील टुनकी, बावनबीर येथून शस्त्र अकोला शहरात येत असल्याची गुप्त माहिती हे. विशेष म्हणजे, टुनकी, बावनबीर येथे 25 हजारापासून एक लाखापर्यंत शस्त्र बनवून दिली जातात. केवळ खंडणी मागणीसाठी आणि गुन्हेगारी क्षेत्रात वर्चस्व कायम राहावे म्हणून शस्त्र खरेदी केली जात असल्याची माहिती आहे.

तरुणांमध्ये बळावतेय शस्त्र बाळगण्याची क्रेझ

गुन्हेगारीच्या वर्चस्वासाठी शस्त्र बाळगण्याचा ट्रेंड वाढत आहे. मात्र, ही शस्त्रे बाळगण्याची क्रेझ वय वर्ष 25 ते 30 वर्ष वयोगटातील तरुणांमध्ये असल्याचे दिसून येत आहे. एकूणच शहरातील नवतरूणांची वाटचाल गुन्हेगारीकडे होत असून, ही बाब पोलिसांसह समाजासाठी चिंतेची बाब ठरत आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी स्थानिक गुन्हे शाखा,विशेष पथक अाणि पोलिसांनी केलेल्या कारवायामध्ये अटक करण्यात आलेल्या बहुतांश आरोपींची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीच्या घरातीलच व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याचे संस्कार लहानग्यावर पडत असल्याचे दिसून येत आहे.

म्हणे, आत्मसंरक्षणासाठी धारदार शस्त्र

बाळगणाऱ्या आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ही शस्त्रे बाळगण्याचे कारण आत्मसंरक्षणासाठी बाळगत असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, आत्मसंरक्षणासाठी असो वा कुणावर वार करण्यासाठी असो विना परवाना शस्त्र बाळगणे आर्म ॲक्टनुसार गुन्हा असल्याने पोलिस अशांवर विशेष लक्ष ठेवून आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com