आदिवासी कोलामांचा पोलिस ठाण्यापुढे ठिय्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

गडचांदूर (जि. चंद्रपूर) : गडचांदूर येथील माणिकगड सिमेंट कंपनीच्या तक्रारीवरून 40 ते 50 आदिवासी कोलाम समाजावर विविध गुन्हे दाखल करण्यात आले. आदिवासींचा गावात जाणारा रस्ताही कंपनीने बंद केला. कोलमांचा छळ माणिकगड व्यवस्थापनाने सुरू केला आहे. त्यामुळे माणिकगड व्यवस्थापनावर ऍट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जनसत्याग्रह संघटनेचे आबीद अली यांच्या नेतृत्वात आदिवासी कोलामांनी स्थानिक पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. 

माणिकड सिमेंट व्यवस्थापन आदिवासी समाजाला वेठीस धरीत आहे. काही जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटकही करण्यात आली. त्यामुळे आता आमच्या तक्रारीनुसार कंपनी व्यवस्थापनावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, रस्ता अडवणुकीचा, मंदिर प्रवेश बंदीचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. आबीद अली, भाऊराव कनाके, मारुती येडमे, अरुण उद्दे, केशव कुळमेथे, झाडू सिडाम, ताराबाई कुळमेथे, पुष्पा मंगाम, शंकर आत्राम यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू करण्यात आले. सकाळी 11 वाजतापासून सुरू असलेले आंदोलन वृत्तलिहिपर्यंत सुरूच होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The tribal kolam strike in front of police station