
गडचिरोली/नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागातील आणि आर्थिक मागास कुटुंबांमधील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. समाज कल्याण विभागाच्या सिरोंचा, वांगेपल्ली (अहेरी) आणि नवेगाव (गडचिरोली) येथील निवासी शाळांमधील १२० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विमानप्रवासाद्वारे बंगळूर येथील इस्रो केंद्राला भेट देण्यासाठी उड्डाण केले.