आपणास पण देवमित्र व्हायचे का? ‘देवाचा मित्र’ या पोस्टने आदिवासी महिलांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

श्रीनाथ वानखडे
Sunday, 22 November 2020

घरातील कपाटात असलेल्या आहेराच्या किंवा नवीन साड्या आपण गोळा करून गरजवंतांना द्यायची. ही कल्पना सर्वांना आवडली. कॉलोनी सर्व मैत्रिणींनी मिळून व काहींनी नवीन खरेदी करून तब्बल १६० साड्या गोळा केल्या. या साड्या चिखलदरा तालुक्यातील सोमवारखेडा येथील महिलांना वाटप करण्यात आले.

मांजरखेड (जि. अमरावती) : सध्या अनेकांच्या फोनवर ‘देवाचा मित्र’ ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. हीच पोस्ट कमलपुष्प कॉलोनीतील एका व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकण्यात आली. त्यात आपणास पण देवमित्र व्हायचे का? असे आवाहन करण्यात आले. याच पोस्टच्या माध्यमातून आदिवासी महिलांना साडी वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले.

दिवाळीत अनेक जन वेगवेगळ्या पद्धतीने सण-उत्सव साजरा करीत आहे. कोणी स्वतःच्या कुटुंबात रममाण होऊन तर कोणी गरजवंताला सहकार्य करून. अमरावती शहरातील कमलपुष्प कॉलोनी ज्यामध्ये बहुतांश शिक्षक परिवार. त्यांचा एक व्हॉट्सॲप समूह आहे. एक दिवस एकीणे ‘देवाचा मित्र’ नावाची पोस्ट समाज माध्यमातून शेयर केली आणि मैत्रिणींना विचारले ‘आपणही देवाचे मित्र बनायचे का’? त्यावर मैत्रिणीच्या ‘कसे’ या प्रश्नांचे उत्तर देताना गरजवंताला साडी वाटप करून.

घरातील कपाटात असलेल्या आहेराच्या किंवा नवीन साड्या आपण गोळा करून गरजवंतांना द्यायची. ही कल्पना सर्वांना आवडली. कॉलोनी सर्व मैत्रिणींनी मिळून व काहींनी नवीन खरेदी करून तब्बल १६० साड्या गोळा केल्या. या साड्या चिखलदरा तालुक्यातील सोमवारखेडा येथील महिलांना एकत्रित आणत सरपंच जसमाय ठाकरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगल बेलसरे, मंसाराम ठाकरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

निमित्त समाज माध्यमवरील पोस्ट जरी असले तरी आदिवासी महिलांना मिळालेल्या साड्याच्या निमित्याने आदिवासींची ‘देवाक काळजी रे’चा अनुभव सोमवारखेडावासीयांना आला.

आत्मिक समाधानाचा अनुभव

आपली परिस्थिती ठिकठाक आहे पण गरिबांचे काय? हा विचार प्रत्येकवेळी मणात घर करते. म्हणूनच मैत्रिणीच्या सहकार्यातून फूल नाही फुलाची पाकळी म्हणून कार्य होते. यापूर्वी हॉलीक्रॉस शाळेतील मैत्रिणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दफ्तर वाटप, एका दिवाळीला स्वेटर वाटप तर कधी वाटर बॉटल्स वाटप केले. या कार्याद्वारे आम्हाला आत्मिक समाधान मिळते, असे मत व्हॉट्सॲप ग्रुपवरल एका सदस्याने व्यक्त केले.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tribal women received sarees through WhatsApp messages in Amravati