Amravati News : मेळघाटच्या आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे; खारी येथील रुग्णवाहिका चालकाने पैसे मागितल्याचा आरोप
Tribal Rights : अचलपूर तालुक्यातील खारी येथील आदिवासी युवकाचा रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्यामुळे मृत्यू झाला. चालकाने डिझेलसाठी सहाशे रुपये मागितल्याचा आरोप.
अचलपूर : जनावरांना हाकलताना पाय घसरून खारी गावातील सखाराम सुखलाल जामूनकर हा तरुण गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याला दवाखान्यात नेण्यासाठी चालकाला रुग्णवाहिका देण्याची मागणी केली असता, त्याने दिली नसल्याने तरुणाचा मृत्यू झाला.