
समुद्रपूर: इंदूर येथून आदिलाबादकडे सोयाबीन बियाणे घेऊन जाणाऱ्या ट्रकला जाम (चौरस्ता) येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर साई हॉटेलसमोर सोमवारी (ता .२६ ) दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागली. ट्रक क्रमांक एमएच १८ बीजी ०१६९ च्या दोन्ही बॅटऱ्या फुटल्यामुळे स्पार्क होऊन ट्रकला आग लागली.