कालव्यात ट्रक शिरला; एक ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

समुद्रपूर, (वर्धा) : नागपूर-चंद्रपूर महमार्गावरील आजदा शिवारातील मारोती मंदिरालगतच्या कालव्यात भरधाव ट्रक शिरला. यात दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. एक मृतदेह पोलिसांच्या हाती आला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. ही घटना आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली.
या ट्रकमध्ये बांधकाम साहित्य होते. हे साहित्य घेऊन जाताना हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर आणि महामार्ग चौकीच्या पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यावेळी ट्रकमधील जखमींना बाहेर काढून रुग्णालयात नेले. यातील एकाला डॉक्‍टरने मृत घोषित केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The truck smashed into the canal; One killed