
शिरपूर जैन : पिंपरी सरहद परिसरात दिनांक २२ जुलै रोजी रात्री दरम्यान मुसळधार पाऊस झाल्याने उतावळी नदीला प्रचंड पूर आला होता. त्यामुळे पुलावरून पाणी वाहत होते. दरम्यान पुलावरून ट्रक पास होत असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहाने तो ट्रक नदीपात्रात वाहून गेला. त्यामध्ये ट्रक चालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.