सीएम चषक द्वारे 50 लाख तरुणांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न

पंजाबराव ठाकरे
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

संग्रामपूर (बुलढाणा): गावपातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी व 50 लाख युवकांना पक्षा सोबत जोडण्याचा उद्देश ठेऊन भाजप तर्फे राज्यभर सीएम चषक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये 288 विधानसभा मतदारसंघांमधून 75 दिवसात 50 लाख स्पर्धकांचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य च्या वतीने पत्रकाद्वारे ही माहिती प्रसिद्ध केली आहे. 

संग्रामपूर (बुलढाणा): गावपातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी व 50 लाख युवकांना पक्षा सोबत जोडण्याचा उद्देश ठेऊन भाजप तर्फे राज्यभर सीएम चषक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये 288 विधानसभा मतदारसंघांमधून 75 दिवसात 50 लाख स्पर्धकांचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य च्या वतीने पत्रकाद्वारे ही माहिती प्रसिद्ध केली आहे. 

क्रिडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे सरकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी विविध खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमही यात घेतले जाणार आहेत. याच माध्यमातून पक्ष मजबुतीसाठी महाराष्ट्रातुन 50 लाख युवकांना भाजपा युवा मोर्चाचे माध्यमातून पक्षाशी थेट जोडण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमाची सुरवात 1 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर चे काळात विधानसभा स्तरावर केली जाणार असून 5 डिसेंबर ते 31 डिसेंबर या काळात जिल्हा स्तरीय स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. या बाबतची तयारी सुरू झाली असून सोशल मीडियावर जास्त जोर दिला जात आहे. या स्पर्धांचा समारोप युवा दिन 12 जानेवारीला राज्यस्तरावर मोठ्या थाटात केला जाणार आहे.

यात आयुष्यमान भारत क्रिकेट, जलयुक्त शिवार व्हालीबाल, शेतकरी सन्मान कबड्डी, सौभाग्य खो-खो, उडान एथलेटिक्स, मुद्रा योजना बुद्धिबळ, स्वछ भारत, कुस्ती, कौशल्य भारत, कॅरम आदी मुख्य खेळाचा समावेश आहे. तर सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये उज्जवला नृत्य स्पर्धा, जनधन एकाकीका स्पर्धा, उजाला गायन स्पर्धा, ग्रामज्योती काव्यवाचन स्पर्धा, इंद्रधनुष्य चित्रकला स्पर्धा, मेक इन इंडिया रांगोळी स्पर्धा आदींचा समावेश आहे. या चषकामध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे गरजेचे आहे. विजेते आणि उपविजेत्यांना रोख पारितोषिके, तसेच विशेष चषक, पदके देण्यात येणार आहेत. सहभागी अशा सर्व खेळाडूंसाठी मुख्यमंत्र्याची स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

1 नोव्हेंबर रोजी जळगाव जामोद मतदार संघातील स्पर्धेचे उदघाटन जळगाव जा येथे होणार आहे. यामध्ये मतदार संघातील इच्छुक स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन आमदार डॉ संजय कुटे यांच्या कार्यालया मार्फत करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trying to reach 5 million youth by CM Cup