

Vidarbha News
esakal
तुमसर: भरधाव वेगाने कोळशाची वाहतूक करणारा ट्रेलर अनियंत्रित होऊन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या टरबूजाच्या दुकानात शिरला. या अपघातात टरबूज खरेदीसाठी थांबलेल्या तरुणाचा चिरडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मृताचे नाव दिनेश ओके (वय ३०) असून ही घटना तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर माडगी येथे वैनगंगा नदी पुलाजवळ गुरुवारी (ता.७) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.