Tur Price Drop : सोयाबीन, कापसापाठोपाठ तुरीच्या दरात घसरण....एकाच आठवड्यात कोसळले ८०० रुपयांनी भाव
Soybean and cotton market updates : यंदाच्या हंगामातील तुरीच्या दरात एकाच आठवड्यात ८८० रुपयांची घसरण झाली आहे. सोयाबीन आणि कापसाच्या नुकसानानंतर शेतकऱ्यांपुढे नवी आर्थिक चिंता उभी राहिली आहे.
अमरावती : यंदाच्या हंगामातील नवीन तूर बाजारात येण्यापूर्वीच दर कोसळले आहेत. एकाच आठवड्याच्या अंतरात ८८० रुपये सरासरी दर पडला आहे. दर पडू लागल्याने सोयाबीन व कापसामुळे नागवल्या गेलेल्या शेतकऱ्यांसमोरील चिंता वाढली आहे.