
रिसोड : मान्सूनपूर्व पडलेल्या अवकाळी पावसामुळे जमिनीमध्ये ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांनी हळद लागवडीला सुरुवात केली आहे. हवामान विभागाच्या मते मान्सून दाखल झाला असला तरी सक्रिय नसल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. परंतु शेतकरी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. यावर्षी जिल्ह्यात हळद लागवड वाढली आहे.