वणीत 25 लाखांची रोकड जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

वणी (जि. यवतमाळ) : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली आहे. निवडणुकीदरम्यान दारू व पैशांचा वापर थांबावा याकरिता प्रशासन कामाला लागले आहे. यानिमित्त ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. शिरपूर पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या बेलोरा फाट्याजवळ तपासणी दरम्यान दुचाकी वाहनातून 25 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

विधानसभेची निवडणूक 21 ऑक्‍टोबरला होणार आहे. त्या करिता प्रशासन कामाला लागले आहे. निवडणुकीदरम्यान पैसे, दारू आदींचा वापर मोठ्या प्रमाणात उमेदवारांकडून केला जातो. मतदारांना विविध प्रलोभने दाखवण्याचाही प्रयत्न केला जातो. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी मतदारसंघाच्या सीमेवर नाकाबंदी करण्यात आली आहे. बुधवारी (ता.25) चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या बेलोरा फाट्याजवळ शिरपूर पोलिसांची नाकाबंदी सुरू होती. दरम्यान, ठाणेदार सतीश चावरे, योगेश ढाले, अनिल सुरपाम वाहनांची तपासणी करीत असताना वणी येथील विठ्ठलवाडी परिसरात राहणाऱ्या संतोष रामचंद्र वाटेकर याच्या दुचाकीची (क्र. एम.एच. 34 पी.पी. 2346) तपासणी केली असता 25 लाख रुपयांची रोकड आढळून आली. यानंतर तातडीने निवडणूक विभागाच्या फिरत्या पथकाला पाचारण करण्यात आले. नायब तहसीलदार वैभव पवार, मंडळ अधिकारी नितीन बांगडे, विस्तार अधिकारी सुरेश पाझरे, उल्हास निमकर यांनी सदर रोकड ताब्यात घेतली असून पुढील कारवाही सुरू आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twenty five lakh saized from two wheeler in wani