MBBS प्रवेशाच्या नावाखाली साडेअकरा लाखाने फसवणूक, दोन आरोपींना अटक

Crime
CrimeSakal

श्रीरामपूर (जि. यवतमाळ) : पुसद शहरातील एका तरुणाची एमबीबीएसला प्रवेश करून देतो, असे सांगून अकरा लाख पस्तीस हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक (Online fraud) करण्यात आली होती. त्यानंतर वसंतनगर पोलिसांनी (vasantnagar police yavatmal) तपास करून बंगळुरू येथील दोन संशयितांना अटक केली आहे.

Crime
ठाकरे अन् फडणवीसांची बंद दाराआड चर्चा? वाचा काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

दिलीप राजे येथे श्रीरामपूर लगतच्या सप्तगिरीनगर येथे राहतात. त्यांच्या मुलाचा एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो असे सांगून तब्बल अकरा लाख पस्तीस हजार रुपये रक्कम खात्यात टाकायला लावली. पैसे देऊन देखील एमबीबीएसला प्रवेश होत नसल्यामुळे त्यांची फसवणूक झाली, असे लक्षात येताच त्यांनी वसंतनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली होती. त्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार रवींद्र जेधे यांनी पथक नेमून आरोपींचा शोध घेण्याची कारवाई सुरू केली. 26 ऑगस्टच्या रात्री संशयित बंगळुरूवरून अटक करण्यात आली. खीम बहादूर थापा (वय42, रा. बेंगलोर, मूळगाव शिलाँग) व शैलेंद्र नंदकुमार जोशी (वय 45, रा. बेंगलोर, मूळगाव कर्वेनगर जि. पुणे) या दोघांना अटक करून पुसदला आणले. शुक्रवारी (ता.27) त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, ही कारवाई वसंतनगर पोलिस ठाण्याचे पथकप्रमुख पोलिस उपनिरीक्षक शशिकांत दोडके, प्रवीण गायकवाड, शेख रफिक व रतीश वानखेडे यांनी पार पाडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com