कोणी लावली मक्‍याच्या शेताला आग?...शेतकऱ्याचे झाले दीड लाखाचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 May 2020

श्रीनिवासपूर येथील दुकीराम परिमल मंडल यांनी 28 एप्रिलला सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मका तोडून एकत्र केला. दुपारची वेळ असल्याने ते दोन तास विश्रांतीसाठी घरी गेले. परत 4 वाजताच्या सुमारास शेतात आले असता दोन एकरमधील मका जळून खाक झाल्याचे त्यांना दिसून आले.

चामोर्शी (जि. गडचिरोली) : चामोर्शी तालुका मुख्यालयापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीनिवासपूर येथील दुकीराम परिमल मंडल यांच्या शेतातील दोन एकरमधील मक्‍याचे पीक जळून खाक झाले. मक्‍याच्या पिकाला अज्ञात नागरिकांनी आग लावल्याने दीड लाखांचे नुकसान झाल्याची घटना चामोर्शी पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या श्रीनिवासपूर बिटात 28 एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

श्रीनिवासपूर येथील दुकीराम परिमल मंडल यांच्या सर्व्हे क्रमांक 137 मध्ये 1.20 आर पैकी 2 एकरातील शेतात मक्‍याच्या पिकाची लागवड केली होती. मका काढणीला आल्यावर 27 एप्रिलला मंडल यांनी आपल्या आईसोबत दोन एकरातील मका तोडणे सुरू केले होते.

दोन एकरामधील मका जळाला
 

श्रीनिवासपूर येथील दुकीराम परिमल मंडल यांनी 28 एप्रिलला सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मका तोडून एकत्र केला. दुपारची वेळ असल्याने ते दोन तास विश्रांतीसाठी घरी गेले. परत 4 वाजताच्या सुमारास शेतात आले असता दोन एकरामधील मका जळून खाक झाल्याचे त्यांना दिसून आले. त्यात त्यांचे दीड लाखाचे मकापीक व पाण्याचे पाइप एक हजाराचा, असे एकूण 1 लाख 51 हजारांचे नुकसान झाले.

तणीस जाळल्याने लागली आग

त्यांच्या शेताच्या बाजूला 200 मीटर अंतरावर सुब्रत मंडल यांची शेती आहे. त्यांनी शेतातील तणीस जाळल्यामुळेच आगीच्या ठिणगीने माझ्या शेतातील मका जळून नुकसान झाल्याचा संशय दुकीराम मंडल यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा : मनाई केल्यानंतरही ती महिला गेली जंगलात...नंतर झाले असे

घटनेची केली तक्रार

घटनेची तक्रार चामोर्शी पोलिस स्टेशनला दिली असता पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस हेड कांस्टेबल जीवन हेडाऊ तपास करीत आहेत. गडचिरोली गडचिरोली गडचिरोली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two acres of corn burned at gadchiroli