जळगाव जामोद - पळशी सुपो येथून शेगावकडे येणाऱ्या मोटरसायकलला भेंडवळ जवळील माऊली फाटा येथे भरधाव टिप्परने जोरदार धडक देऊन चिरडले. या अपघातात मोटरसायकलवरील दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी संतप्त जमावाने टिप्पर पेटवून दिले.