
अमरावती : शहरालगतच्या महादेवखोरी (mehadeokhori forest) परिसरात वनविभागाच्या जंगलामध्ये अल्पवयीन मुलामुलीचे गळफास घेतलेल्या स्थितीत झाडांवर लटकलेल्या अवस्थेत कुजलेले मृतदेह (dead bodies of teenagers) गुरुवारी (ता. 20) सायंकाळी पाचच्या सुमारास आढळले. (two dead bodies of teenagers found in mahadeokhori forest in amravati)
मुलगी राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील मेहरबाबा कॉलनी येथील रहिवासी आहे, तर मुलगा फ्रेजरपुराहद्दीत संजय गांधीनगर येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलगा हरविल्याची तक्रार त्याच्या पालकांनी 13 मे रोजी फ्रेजरपुरा ठाण्यात नोंदविली, तर त्याच दरम्यान मुलगी हरविल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी राजापेठ ठाण्यात केली होती. प्रकरणी दोन्ही ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचे गुन्हे दाखल होते. अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचे प्रकरण असल्यामुळे राजापेठ पोलिसांनी मुलीचे कॉलडिटेल्स तपासले असता, त्यात अल्पवयीन मुलाचे नाव आढळले. राजापेठ पोलिस मुलाच्या घरापर्यंत पोहचले व चौकशी केली असता, मुलगासुद्धा हरविल्याची तक्रार त्याच्याही पालकांनी फ्रेजरपुरा ठाण्यात नोंदवली असल्याची बाब पुढे आली. आज (ता. 20) कोणाला तरी दुर्गंधी आली. त्यामुळे त्याने फ्रेजरपुरा पोलिसांसह वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. फ्रेजरपुरा पोलिस घटनास्थळी पोहोचले. फ्रेजरपुरा पोलिसांनी अकस्मात मृत्यू, अशी नोंद घेतली. रात्री साडेआठ वाजेपर्यंत फ्रेजरपुरा पोलिस महादेवखोरी येथील जंगलात तळ ठोकून होते. मुलामुलीच्या पालकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पालकांनी पाहणी केल्यानंतर दोघांची ओळख पटली, असे सहायक पोलिस निरीक्षक विजय मगर यांनी सांगितले. पोलिसांच्या मते आत्महत्येची घटना सहा ते सात दिवसांपूर्वीची असू शकते.
घटनास्थळी शवविच्छेदनाचे प्रयत्न
दोन्ही मृतदेह कुजल्यामुळे शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेणे शक्य नव्हते. त्यामुळे घटनास्थळीच शवविच्छेदन करण्याच्या दृष्टीने फ्रेजरपुरा पोलिसांनी जिल्हा शल्यचिकित्सकांसोबत संपर्क साधून प्रयत्न सुरू केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.