Chandrapur Accident : चंद्रपूर अहेरी मार्गावर अपघात, ओव्हरटेकच्या नादात दोन जणांचा मृत्यू
Accident News : गोंडपिपरी-चंद्रपूर-अहेरी मार्गावर गणपूरजवळ पिकअप आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला रुग्णालयात दाखल केले.
गोंडपिपरी : चंद्रपूर-अहेरी मार्गांवरील गणपूरजवळ पिकअप-ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एक गंभीररित्या जखमी झाला. ही घटना आज (ता. १३) सहा वाजता दरम्यान घडली.