भंडारा-पवनी मार्गावर भीषण अपघात, कंटेनर-टेम्पोच्या धडकेत दोन ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

‌तिर्री (मिन्सी) येथील उत्तम बाबूराव रणदिवे याचा कोंबड्यांचा व्यवसाय आहे.आज तो टेम्पोने कोंबड्या खरेदीसाठी कोंढा येथे आला होता. आमगाव येथील आश्रमशाळेत शिकत असलेला सौरभ सुट्टी असल्याने गावी आला होता. तोसुद्धा त्याच्या टेम्पोने कोंढा येथे आला होता.

कोंढा-कोसरा (जि. भंडारा) : भंडारा-पवनी मार्गावरील कोंढा चुऱ्हाड फाट्याजवळ
भरधाव कंटेनर आणि मिनी टेम्पोची जोरदार धडक झाली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर, एक जण गंभीर जखमी झाला. गुरुदास रामदास घोडमारे (वय २४) आणि सौरभ रमेश राणे (वय १३) अशी मृतांची नावे आहेत.

‌तिर्री (मिन्सी) येथील उत्तम बाबूराव रणदिवे याचा कोंबड्यांचा व्यवसाय आहे.आज तो टेम्पोने कोंबड्या खरेदीसाठी कोंढा येथे आला होता. आमगाव येथील आश्रमशाळेत शिकत असलेला सौरभ सुट्टी असल्याने गावी आला होता. तोसुद्धा त्याच्या टेम्पोने कोंढा येथे आला होता.

ट्रकखाली उतरून लघुशंका करणे पडले महागात

दुपारी १२ वाजताच्या सुमारास चुऱ्हाड ‌फाट्यावर विरुद्ध दिशेने भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने (क्र. आरजे/०९ जीए ४३२८) टेम्पोला (क्र. एमएच ३१/डीएस १९९८) जोरदार धडक दिली. यात गुरुदास घोडमारे आणि सौरभ राणे यांचा जागीच मृत्यू झाला तर, टेम्पो मालक
‌उत्तम बाबूराव रणदिवे (वय ३५) गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. अड्याळ पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून आरोपी कंटेनर चालकाला अटक ‌केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two died in road accident at bhandara pauni road