विदर्भात दोन शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा; नापिकी, कर्जाला होते कंटाळले

टीम ई सकाळ
Thursday, 5 November 2020

मरावती शहरालगतच्या खानापूर येथील युवा शेतकरी तुषार ज्ञानेश्‍वर अवघड (वय २२) याने सततच्या नापिकीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी (ता. तीन) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. त्याने घरातील खोलीत पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला.

यवतमाळ-अमरावती : सततची नापिकी आणि कर्डबाजारीपणाला कंटाळून विदर्भातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. हे दोन शेतकरी प्रत्येकी यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील आहेत.

प्राप्त माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील माळेगाव (ता. आर्णी) येथील शेतकरी कैलास दगडू पवार (वय ४५) यांनी सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. त्यांनी ऑक्टोबर महिन्यात २६ तारखेला घरात विषप्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर ३० ऑक्‍टोबरला त्यांचा त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले व सून व मोठा परिवार आहेत.

दुसरी आत्महत्याची घटना अमरावती जिल्ह्यातील खानापूर येथे घडली. अमरावती शहरालगतच्या खानापूर येथील युवा शेतकरी तुषार ज्ञानेश्‍वर अवघड (वय २२) याने सततच्या नापिकीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी (ता. तीन) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. त्याने घरातील खोलीत पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. मोठा भाऊ चेतन अवघड यांनी नांदगावपेठ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यू, अशी नोंद केली आहे.

सविस्तर वाचा - प्रवासादरम्यान नेहमी मळमळ आणि उल्टीचा त्रास होतो? घाबरू नका पुढील उपाय नक्की करून बघा

हृदयविकाराच्या झटक्याने सुरक्षा जवानाचा मृत्यू

अमरावतीच्या वडाळी परिसरातील रहिवासी तसेच देशाच्या सीमा सडक संघटनेतील सुरक्षा जवान नारायण काशीराव रेवस्कर यांचे मंगळवारी (ता. ३) दुपारी सेवेवर असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नारायण रेवस्कर राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात देशाच्या सीमेवर सेवा देत होते. मृत्यूसमयी ते ५८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली आहेत. त्यांच्या मृत्यूची माहिती सीमा सडक संघटना (बीआरओ) विभागाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दिली.

संपादन - नीलेश डाखोरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two farmers commit suicide in Vidarbha