सर्व रात्रीला मिळून जेवले, 'ते' खोलीत गेले अन् काही वेळातच झालं होत्याचं नव्हतं

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 February 2021

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील दिलीप गोविंदा राजूरकर (वय ४८) या शेतकऱ्याच्या मुलीचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांच्यावर खासगी व बँकेचे ३५ हजार रुपयांच्यावर कर्ज होते.

नागपूर : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून यवतमाळ आणि भंडारा जिल्‍ह्यातील दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - Success Story : एकदाच केली दीड लाखांची गुंतवणूक आता...

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील दिलीप गोविंदा राजूरकर (वय ४८) या शेतकऱ्याच्या मुलीचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांच्यावर खासगी व बँकेचे ३५ हजार रुपयांच्यावर कर्ज होते. चार वर्षांपासून शेतात नापिकी होत असल्याने कर्जफेड करू शकले नाही. खासगी कर्जदारांकडून उसनवार घेतलेल्या पैशांसाठी तगादा सुरू होता. पैसे जवळ नसल्याने दिलीप राजूरकर एक महिन्यापासून चिंतीत होते. बुधवारी सर्वांनी मिळून जेवण केले. बुधवारी (ता.१०) रात्री त्यांनी गळफास घेतल्याचे लक्षात येताच तत्काळ ग्रामीण रुग्णालयात नेले. परंतु, तपासणी करताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. एक वर्षापूर्वीच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्‍चात विवाहित मुलगी, मुलगा, पत्नी, आई आहे. 

हेही वाचा - वसुलीबाज शाळांविरुद्ध 'अ‌ॅक्शन प्लॅन', आतापर्यंत फक्त पाच शाळांना वसुलीची नोटीस

आत्महत्येची दुसरी घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील विरली (बुज) येथे आज, बुधवारी उघडकीला आली. देविदास बळीराम चुटे (वय ४७) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी चुटे यांच्याकडे पाऊण एकर शेती आहे. या शेतीवर चुटे यांनी विवेकानंद पतसंस्था, ग्रामीण बँक यासह अन्य खासगी सावकारांचे जवळपास ४ लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र सततच्या नापिकीमुळे कर्जाची परतफेड होत नसल्याने गत काही दिवसांपासून ते मानसिक तणावात होते. घटनेच्या दिवशी सकाळी पत्नी व मुलगा शेतीकामासाठी गेले असताना घरातील एका खोलीत त्यांनी गळफास घेतला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two farmers committed to suicide in yavatmal and bhandara