दोन मित्र मोटारसायकलने जात होते गावी, अन्‌ अचानक काळ आला आडवा... 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 मार्च 2020

बोर्डा येथील अनिकेत सागोरे आणि देवानंद सोयाम एमएच 34 बीए 4510 क्रमांकाच्या मोटारसायकलने चिचपल्ली येथे गेले होते. दुपारच्या सुमारास ते गावाकडे परत येण्यासाठी निघाले होते.

चंद्रपूर : चिचपल्ली येथून मोटारसायकलने गावाकडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. अनिकेत प्रशांत सागोरे (वय 19) आणि देवानंद सोयाम (वय 17) अशी मृतांची नावे आहेत. 

ही घटना गुरुवारी (ता.12) दुपारच्या सुमारास चंद्रपूर-मूल मार्गावरील दुधा नाल्याजवळ घडली. बोर्डा येथील अनिकेत सागोरे आणि देवानंद सोयाम एमएच 34 बीए 4510 क्रमांकाच्या मोटारसायकलने चिचपल्ली येथे गेले होते. दुपारच्या सुमारास ते गावाकडे परत येण्यासाठी निघाले होते.

अवश्य वाचा-  पोहण्याचा मोह अनावर झाला अन् दोन मुलांनी जीव गमावला

देवानंदने नुकतीच दिली बारावीची परीक्षा

दुधा नाल्याजवळ चंद्रपूरकडून मूलकडे जाणाऱ्या भरधाव वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर स्वार दोन्ही मित्रांचा मृत्यू झाला. अपघातानंतर धडक देणारे वाहन पळून गेले. देवानंद सोयाम याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती, तर अनिकेत हा भवानजीभाई चव्हाण महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two friends were going to their village and accident happend

टॅग्स
टॉपिकस