धाड - बुलडाणा तालुक्यातील धाड गावात ३० नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० दरम्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका विशिष्ट समाजाचे लोकांनी मिरवणुकीनिमित्त फटाके फोडल्यानंतर गावातील दुसऱ्या सामाजातील लोकांनी विरोध केला..काही वेळात वादात रुपांतर झाले नंतर याचे पर्यवसान दंगलीत झाले थोड्याच वेळात जामावाने तुफान दगडफेक करण्यात आली. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहे.गावात पोलीसांची कुमक गस्त घालत होती सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.सुमारे दोन तास दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक करण्यात येत होती, याठिकाणी घटनास्थळी पोलीसांनी परीस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यावेळी पोलीसबळ कमी पडल्याने संतप्त जमावावर पोलीसांना नियंत्रण ठेवणे कठीण झाले होते..जवळपास दिड तासानंतर बुलडाणा येथुन अतिरिक्त पोलीस बळ, दंगाकाबु पथक घटनास्थळी दाखल झाल्या नंतर दंगलीत सहभागी जमाव पांगला यामध्ये सहा मोटारसायकल, दोन ॲटो, हातगाडी, हॉटेलचे साहित्याची जाळपोळ करण्यात आली.रात्री उशिरापर्यंत पोलीसांनी गावात गस्त घालत दंगलखोरांचा शोध घेतला, यामध्ये रात्री उशिरापर्यंत पोलीसांनी गावातील ३३ जणांविरोधात दंगलीचे आणि विविध प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी १८ जणांना पोलिसांनी अटक केली असून यामध्ये आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे..याठिकाणी रात्री पोलिस उपविभागीय अधिकारी आणि पोलीस उपअधीक्षक बि.बी.महामुनी यांनी पाहणी केली. रात्रभर गावात पोलीसांची कुमक गस्त घालत होती सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.पोलिस दल परतले माघारीपोलीसांनी सकाळी घडलेल्या घटनेनंतर अतिरिक्त पोलिस दल याठिकाणी बोलवले होते, परंतु दुपारी पाचारण करण्यात आलेले. पोलिस दल परत माघारी पाठवण्यात आले. घटना घडल्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात अत्यंत तोकडा पोलिस बंदोबस्त उपस्थित होता. त्यामुळे दंगलखोरांना आवरण्यात स्थानिक पोलिसांना यश आले नाही..धाड येथील घडलेल्या घटनेची फिर्याद पोलीसांच्या वतीने येथील पोलिस ठाण्यात कार्यरत गोपीनीय ठाणे अंमलदार राजु माळी यांनी दिली. धाड येथे आज दुपारी विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी भेट देऊन घटनास्थळी पाहणी करुन नागरिकांनी शांतता पाळण्याचे आवाहन केले..शाब्दिक चकमकीतून वाद उफाळलाधाडमध्ये एका समाजाचे वतीने मिरवणूक काढण्यात आली होती. दरम्यान मिरवणूक सुरू होण्यापूर्वी समाजाचे तरुणांनी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडण्याचा प्रयत्न करताना. याठिकाणी दुसऱ्या समाजाचे तरुणांनी विरोध केला असता त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली..दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूला शांतता प्रस्थापित केली. मात्र रात्री ९.३० दरम्यान त्या विशिष्ट समाजाचे असंख्य लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके वाजवले यातुनच वादाची ठिणगी पडली.नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, आपले व्यसायीक प्रतिष्ठान सुरळीत चालू ठेवावे. समाजकंटकावर प्रशासन योग्य कारवाई करणार.- बी. बी. महामुनी, पोलिस उपअधीक्षक, बुलडाणा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.