इनोव्हेशन पर्वातील दोनशे संकल्पना लक्षवेधक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

नागपूर : मागील महिन्यात पार पडलेल्या इनोव्हेशन पर्वात आलेल्या दोन हजारांवर संकल्पनांपैकी दोनशे संकल्पना लक्षवेधक ठरल्या. यातील आणखी शंभर सर्वोत्तम संकल्पनांची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर एक ते तीन संकल्पनांना जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले. किमान एकाने जरी जगपातळीवर नाव कमावले तर या उपक्रमाचा उद्देश साध्य होईल, अशी पुस्तीही महापौरांनी जोडली.

लिका, मेयर इनोव्हेशन कौन्सिलच्या वतीने आयोजित "इनोव्हेशन पर्व'मध्ये विद्यार्थ्यांनी मांडलेल्या संकल्पनातून दोनशे संकल्पनांची पुढच्या स्तरासाठी निवड करण्यात आली. या दोनशे संकल्पनांना पुरस्कृत करण्यासाठी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात "द हॅकाथॉन 2.O-नेक्‍स्ट स्टेप : इनक्‍युबेशन' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. मंचावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, नीरीचे संचालक राकेशकुमार, आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, माजी आमदार मोहन मते, मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे संयोजक डॉ. प्रशांत कडू, मेयर इनोव्हेशन कौन्सिलच्या सदस्य डॉ संध्या दाभे, इनोव्हेशन पर्वचे समन्वयक केतन मोहितकर उपस्थित होते. इनोव्हेनशन पर्वनिमित्त विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्राबाबत माहिती व्हावी, यादृष्टीने वेबसाईट तयार करण्यात येईल, अशी माहितीही महापौर नंदा जिचकार यांनी दिली.
प्रास्ताविकातून डॉ. प्रशांत कडू यांनी हॅकाथॉनच्या माध्यमातून नऊ थीमअंतर्गत 2,370 नवसंकल्पनांची विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे नमूद करीत त्यापैकी 763 संकल्पनांचे सादरीकरण झाल्याचे सांगितले. त्यातील सर्वोत्तम दोनशे संकल्पनांची दुसऱ्या फेरीमध्ये निवड केली आहे. या संकल्पनांना मार्गदर्शन करण्यात येईल. उद्योगात त्याला परावर्तित कसे करता येईल, याचा अभ्यास करण्यात येईल. अंमलबजावणीच्या दृष्टीने चाचपणी करून तशा शंभर उत्तम संकल्पना निवडण्यात येईल. यातूनही सर्वोत्कृष्ट तीन किंवा चार संकल्पनांना जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी दोनशे निवड झालेल्या संकल्पना मांडणाऱ्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. परीक्षकांचाही गौरव करण्यात आला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two hundred concepts worth noting in the Innovation Curve