वनवे वाहतूक ठरली जीवघेणी; अपघातात दोघे ठार, कारचा चुराडा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील खडका शिवारात गुरुवारी (ता. 20) सकाळी सात वाजता भरधाव कंटेनर व कारमध्ये समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील अनंत व्यंकटराव मुसळे (वय 52) व सुभाष दत्तात्रेय गायकवाड (वय 55) दोघेही रा. वाशीम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. 

तळेगाव (जि. वर्धा) : आजचा गुरुवात खऱ्या अर्थाने "काळ'वार ठरला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी भंडाऱ्यावरून देवदर्शन घेऊन परत येत होते. वाटेत चालकाला रस्त्याच्या कडेला उभा असलेला नादुरुस्त ट्रक न दिसल्याने धडक दिली. या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झाले तर सात जण जखमी झाले. ही घटना ताजी असतानाच वर्धेत दोघांचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. 

प्राप्त माहितीनुसार, नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील खडका शिवारात गुरुवारी (ता. 20) सकाळी सात वाजता भरधाव कंटेनर व कारमध्ये समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील अनंत व्यंकटराव मुसळे (वय 52) व सुभाष दत्तात्रेय गायकवाड (वय 55) दोघेही रा. वाशीम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. 

वाशीमच्या जात पडताळणी विभागातील जिल्हा संशोधन विभागाचे जिल्हा संशोधन अधिकारी अनंत मुसळे व जिल्हा आरोग्य विभाग, राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य मिशन, वाशीमचे सुभाष गायकवाड हे दोघेही न्यायालयाच्या कामानिमित्त एमएच 37 - जी 1601 या क्रमांकाच्या कारने नागपूर येथे जात होते. तर एमएच 14 - एफटी 8595 क्रमांकाचा कंटेनर हा नागपूरकडून अमरावतीकडे जात होता. 

महत्त्वाची बातमी - म्हणून देवेंद्र फडणवीसांना चढावी लागली कोर्टाची पायरी, लिहून द्यावे लागले हे...

नागपूर-अमरावती मार्गावरील वर्धा नदीवरील पुलावर एक्‍सपेंटेशन ज्वाइंटचे काम 15 दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे अमरावतीकडे जाणाऱ्या बाजूचा मार्ग बंद करून भिष्णूर फाट्यापासून ते नवी भारवाडीदरम्यान दोन किलोमीटरपर्यंतची वाहतूक एकाच बाजूने वळविण्यात आली आहे. एकाच बाजूने दोन्ही मार्गांची वाहतूक सुरू असल्याने दोन्ही वाहने एकमेकावर धडकली. या भीषण अपघातात अनंत मुसळे आणि सुभाष गायकवाड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. धडक एवढी भीषण होती की कारचा घटनास्थळावरच चुराडा झाला. 

चालकाने काढला पळ

अपघात होताच चालकाने अमरावती जिल्ह्याच्या हद्दीत भारवाडीसमोर कंटेनर सोडून पळ काढला. घटनेची माहिती तळेगाव पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पुढील तपास तळेगाव (श्‍यामजीपंत) पोलिस करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two killed in car and container accident in Wardha district