esakal | यवतमाळमध्ये आणखी दोघांचा वीज पडल्याने मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

यवतमाळमध्ये आणखी दोघांचा वीज पडल्याने मृत्यू

यवतमाळमध्ये आणखी दोघांचा वीज पडल्याने मृत्यू

sakal_logo
By
अशोक काटकर

दारव्हा (जि. यवतमाळ) : तालुक्यातील कुंभारकीन्ही आणि मोरगव्हान येथे अंगावर वीज कोसळल्याने दोघांचा जागीच मृत्यू (Death of both) झाला. ही घटना गुरुवारी (ता. १०) दुपारी घडली. आकाश प्यारेलाल जाधव (३०, रा. कुंभारकीन्ही) व अशोक रायसिंग राठोड (रा. मोरगव्हान) असे मृत्यू झालेल्यांचे नाव आहे. (Two-killed-in-lightning-strike-in-Yavatmal-district)

कुंभारकीन्ही येथे गावातील शेतकरी गुलाब किसन चव्हाण यांच्या शेतात आकाश कामाला होता. शेतीचे काम सुरू असताना दुपारी वीजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्याचवेळी अचानक दुपारी तीन वाजता वीज आकाशच्या अंगावर कोसळली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तो विवाहित असून त्याच्या मागे मोठा आप्तपरिवार आहे.

हेही वाचा: यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून दोन ठार; दुसऱ्या दिवशीही मुसळधार

मोरगव्हान येथील अशोक राठोड यांचा लाडखेड शिवारात दुपारी २ ते ३ वाजताच्या सुमारास अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला. दोघांकडेही शेतजमीन नसल्याने मजुरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. संबंधित तलाठ्यांनी या घटनेचा अहवाल तहसीलदारांना दिला आहे.

कालही झाला दोघांचा मृत्यू

कळंब तालुक्यातील शरद या गावातील सुखदेव पारणू कोरझडे (वय २७) या तरुणाचा मंगळवारी वीज पडून मृत्यू झाला होता. सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या मुसळधार पावसात वीज पडून सुखदेव कोरझडे जागीच ठार झाला; तर कमलाकर मेश्राम गंभीर जखमी झाला. पुसद तालुक्यातील जमशेदपूर येथे दुपारी दीड वाजता शेतात काम करताना अंगावर वीज पडल्याने समीक्षा पिंटू जाधव (वय १४) ही मुलगी मृत्युमुखी पडली होती. तिच्या मृत्यूमुळे जमशेदपूरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

(Two-killed-in-lightning-strike-in-Yavatmal-district)