Vidarbha Crime : मंगरूळ नवघरे गावात एकाच रात्री दोन हत्या
Police Investigation : चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे व अमडापूर येथे एकाच रात्रीत दोन हत्या घडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस तपास सुरू असून घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंगरुळ नवघरे (चिखली) : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अमडापूर पोलिस स्टेशन अंतर्गत एकाच रात्री दोन खुनाच्या घटना घडल्या. आज, १७ एप्रिलच्या सकाळी या घटना उजेडात आल्या आहेत. एक घटना मंगरूळ नवघरे येथील असून दुसरी घटना अमडापूर येथील आहे.