esakal | शेतातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेल्या महिला; डोकावून पाहताच सरकली पायाखालची जमीन
sakal

बोलून बातमी शोधा

Two leopards die after falling into a well in Bhandara district

उपवनसंरक्षक भलावी, सहायक वनसंरक्षक नागुलवार, गडेगावचे प्रकाष्ट निष्कासन अधिकारी साकेत शेंडे, साकोलीचे सहायक वनसंरक्षक रोशन राठोड, पवनीच्या वनपरिक्षेत्राधिकारी कोमल जाधव, भंडाराचे वनपरिक्षेत्राधिकारी विवेक राजुरकर, वनपरिक्षेत्राधिकारी (फिरते पथक) संजय मेंढे, रॅपिड रेस्क्यू युनिटची चमू घटनास्थळी दाखल झाली.

शेतातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेल्या महिला; डोकावून पाहताच सरकली पायाखालची जमीन

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पवनी (जि. भंडारा) : अड्याळ वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या कलेवाडा येथील शेतातील विहिरीत दोन बिबट्यांचा मृतदेह आढळून आला. सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

कलेवाडा येथील सरस्वता ज्ञानेश्‍वर घोगरे यांच्या शेतात दोन बिबटे मृतावस्थेत पडून असल्याची माहिती माजी सरपंच मोहन घोगरे यांनी वनविभागाला दिली. या माहितीवरून अड्याळचे वनाधिकारी घनश्‍याम ठोंबरे व क्षेत्र सहायक विनोद पंचभाई यांच्या नेतृत्वात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. तसेच त्यांनी याबाबतची माहिती भंडाराचे उपवनसंरक्षक भलावी, सहायक वनसंरक्षक नागुलवार यांना दिली. त्यानंतर संपूर्ण क्षेत्राची तपासणी केली.

अधिक माहितीसाठी - पत्नी सतत प्रियकराशी बोलते या संशयातून पतीने केला खून; लग्नाना झाले होते फक्त तीन महिने

उपवनसंरक्षक भलावी, सहायक वनसंरक्षक नागुलवार, गडेगावचे प्रकाष्ट निष्कासन अधिकारी साकेत शेंडे, साकोलीचे सहायक वनसंरक्षक रोशन राठोड, पवनीच्या वनपरिक्षेत्राधिकारी कोमल जाधव, भंडाराचे वनपरिक्षेत्राधिकारी विवेक राजुरकर, वनपरिक्षेत्राधिकारी (फिरते पथक) संजय मेंढे, रॅपिड रेस्क्यू युनिटची चमू घटनास्थळी दाखल झाली.

त्यांनी सखोल चौकशी केली. विहिरीत पडून या बिबट्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृत बिबट्यांना विहिरीबाहेर काढल्यानंतर डॉ. गुणवंत भडके, डॉ. वराटकर, डॉ. विठ्ठल हटवार, डॉ. देविदास रेहपाडे यांनी शवविच्छेदन केले.

जाणून घ्या - ‘मुलांनो, आम्हाला माफ करा; आमचे मृतदेह मेडिकल कॉलेजला दान करा’ अशी चिठ्ठी लिहून दाम्पत्याची आत्महत्या

गोंदियातही झाला होता दोघांचा मृत्यू

भंडारा जिल्ह्याला लागून असलेल्या गोंदिया जिल्ह्यात तीन दिवसांत दोन बिबट मृतावस्थेत आढळून आले होते. दोन्ही बिबट हे शेतात मृत आढळहे होते. बिबट्यांचे चारही पाय, नख आणि मिश्या नव्हत्या. यामुळे त्यांची शिकार केल्याची शंका उपस्थित करण्यात येत होती. आता पुन्हा बिबट मृतावस्थेत आढळून आला. मात्र, त्यांचे मृतदेह विहिरीत तरंगताना आढळ्याने त्यांचा मृत्यू कसा झाला, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

loading image