esakal | दोन नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, आठ लाखांचे होते बक्षीस
sakal

बोलून बातमी शोधा

maoist

दोन नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, आठ लाखांचे होते बक्षीस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : आठ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षलवाद्यांनी (two maoist surrender) पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांच्यासमोर नुकतेच आत्मसमर्पण केले आहे. नक्षलवादी विनोद ऊर्फ मनिराम नरसु बोगा (वय ३२) कविता ऊर्फ सत्तो हरीसिंग कोवाची, असे या नक्षलवाद्यांचे नाव आहे. नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आत्मसमर्पण केल्याने नक्षली हालचालींवर अंकुश ठेवण्यात गडचिरोली पोलिस (gadchiroli police) दलास मोठे यश प्राप्त झाले आहे. (two maoist surrender in gadchiroli police)

हेही वाचा: महापालिका निवडणूक सहा महिने लांबणार; विधेयकाला मंजुरी नाही

विनोद बोगा व कविता कोवाची हे दोघे पती-पत्नी असून विनोद हा कोरची दलममध्ये एसीएम पदावर दलम डॉक्टर म्हणून कार्यरत होता व त्याची पत्नी कविता ही पार्टी मेंबर या पदावर टिपागड दलममध्ये कार्यरत होती. विनोदवर खुनाचे १३, चकमकीचे २१, जाळपोळ १ व इतर ५ असे गुन्हे दाखल असून पत्नी कवितावर चकमकीचे ५, जाळपोळ १ व इतर ३ असे गुन्हे दाखल आहेत. शासनाने विनोदवर ६ लाखांचे तर, कवितावर २ लाखांचे बक्षिस जाहीर केले होते.

शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवांद्याचा झालेला खात्मा, तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलिस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत. गडचिरोली पोलिस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे २०१९ ते २०२१ मध्ये एकूण ४३ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामध्ये ४ डिव्हीसी, २ दलम कमांडर, ३ उपकमांडर, ३३ सदस्य व १ जनमिलीशिया यांचा समावेश आहे.

आतापर्यंत एकूण ६४७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून गडचिरोली पोलिस दलाच्या माध्यमातून त्यांच्यापैकी १२७ सदस्यांना भूखंड वाटप, १०७ सदस्यांना घरकुल वाटप, ६४३ सदस्यांना आधारकार्ड वाटप, ३६ महिला सदस्यांना शिलाई मशिनचे वाटप, २३ सदस्यांना शेळी पालन व इतर अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. त्यामुळे आत्मसमर्पीत नक्षलवाद्यांचे प्रमाण वाढत असून ते लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील होऊन सन्मानाने जीवन जगत आहेत.

या दोन्ही नक्षलींचे आत्मसमर्पण घडवून मुख्य प्रवाहात आणण्याबाबतची कारवाई गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात धानोराचे उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव यांनी पार पाडून मोठी भूमिका बजावली आहे.

loading image
go to top