
यवतमाळ : चारित्र्याच्या संशयावरून जिल्ह्यात २४ तासात दोन विवाहित महिलांची हत्याच्या घटना घडल्या आहेत. दोन्ही घटनेत मारेकरी पतीच निघाला असून, दोन्ही मारेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पहिली घटना यवतमाळ तालुक्यातील रुई येथे बुधवारी (ता. ६) दुपारच्या सुमारास घडली. तर दुसरी घटना गुरुवारी (ता. ७) चौसाळा मार्गावरील बोदड येथे घडली.